स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने 1930 मध्ये 9,10 आणि 11 मे असे 3 दिवसांचे स्वातंत्र्य अनुभवलं. मल्लप्पा धनशेट्टी,
किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन या सोलापूरच्या चार हुतात्म्यांना 12 जानेवारी 1931 ला येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली. हा दिवस सोलापुरात हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.