सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बुधवार पेठ येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार या ठिकाणी आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त मनिषा मगर,नगर अभियंता सारिका अकुलवार,माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी,चंद्रकांत सोनावणे, विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर हिदायत मुजवार,कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे, पशु वैधकीय अधिकारी डॉ सतीश चौगुले, उद्यान प्रमुख किरण जगदाळे उपस्थित होते.