सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भैय्या चौक येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयात हापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे,मंडई व उद्यान सभापती गणेश पुजारी, परिवहन सभापती जय साळुंके, गटनेते आनंद चंदनशिवे,नगरसेविका स्वाती आवळे, समाधान आवळे,कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी रुउफ बागवान,मध्यवर्तीचे अध्यक्ष राजू क्षीरसागर, लखन गायकवाड,मलिकार्जुन कांबळे, सुरेश पाटोळे, रोहन कामने, युवराज पवार, रोहन लोंढे, रोहित खिलारे, अनिल उक्रंडे, सुभाष शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.