सोलापूर : महानगरपालिकेच्या वतीने आदी जांबमुनी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त जांबमुनी महाराज यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी गटनेते चेतन नरोटे, गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेविका वैष्णवी करगुळे, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका मीनाक्षी कंपली, बाबा करगुळे, मारअप्पा कंपली, सिद्राम माडेकर, जयप्रकाश अमनगी, सुरेश लिंगराज आदी मान्यवर होते.