सोलापूर दि.12:- राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त आज जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.