सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आद्य कवि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सभागृहनेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेविका राजश्री चव्हाण, नगरसेविका स्वाती आवळे, नगरसेविका अनिता कोंडी, दादा भुसनर आदी मान्यवर उपस्थित होते.