सोलापूर : महानगरपालिकेच्या वतीने बुरुड समाजाचे आराध्यदैवत व सामाजिक समतेचे प्रणेते शिवभक्त मेदार केतय्या तथा संतश्री बुरुड केतेश्वर महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त बुरुड केतेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दशरथ वडतीले, पंडित वडतीले,विठ्ठल साळुंखे, अरुण साळुंखे,नितीन मोहिते,ज्ञानेश्वर सुरवसे, राम मोरे, नवनाथ सुरवसे,राम जतकर,गंगाराम वडतीले,विष्णू साळुंखेयुवराज सुरवसे,नितीन रोहिटे,डॉ पल्लवी सावंत,सारिका मोरे,ज्योतिताई वडतीले आदींसह समाजबांधव उपस्थित होते.