सोलापूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी प्रत्येक युवकांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे,लोकशाहीचे रक्षण करावे.संविधानावर प्रतिगामी लोकांचा आघात सुरू आहे.पण आघाताला परतून लावण्यासाठी संविधान इतके मजबूत आहे.असे मत अभिवादन करताना ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जाती अंत संघर्ष समिती च्या वतीने 6 डिसेंबर रोजी दत्त नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सीटू चे जिल्हा कोषाध्यक्ष दीपक निकंबे व नरेश दुगाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रजा नाट्य मंडळाकडू न क्रांतिगीत सादर करण्यात आले.
यावेळी ऍड.एम.एच. शेख म्हणाले की,भारतातील मानवमुक्तीचा सर्वोच्च ग्रंथ संविधान आहे.हे संविधान अबाधित राखणे आपले कर्तव्य आहे.
यावेळी व्यंकटेश कोंगारी, नसीमा शेख,सिद्धप्पा कलशेट्टी, शेवंता देशमुख, कुरमय्या म्हेत्रे,रंगप्पा मरेड्डी,सलीम मुल्ला, विल्यम ससाणे,बापू साबळे,विक्रम कलबुर्गी, बाळासाहेब मल्याळ, विजय हरसुरे,दत्ता चव्हाण,मल्लेशाम कारमपुरी,वीरेंद्र पद्मा श्रीनिवास गड्डम,आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम यांनी केले.