अनुभव प्रतिष्ठानच्या अनुभव रत्न पुरस्काराचे वितरण
सोलापूर : सोलापुरात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मान्यवरांचे विकासात मोठे योगदान आहे. त्यांचे आपापल्या क्षेत्रातील कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. असे हिरे शोधून त्यांचा पुरस्काराने सन्मान महत्त्वाचा आहे. स्तुत्य आणि कौतुकास्पद काम अनुभव प्रतिष्ठान करीत आहे, असे गौरोद्गार उमेश कदम यांनी येथे काढले.
अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे अनुभव रत्न पुरस्कार वितरण सोहळा रविवारी लोकमान्य टिळक सभागृह,पार्क चौक,येथे पार पडला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणुन उपसंपादक,दैनिक दिव्य मराठी,श्री उमेश कदम,सहाय्यक आयुक्त एम्प्लॉयमेंट ( सेवानिवृत्त),
श्री रमेश हुमनाबादकर,स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉ सौ सुनीता देगावकर,माझी अधीक्षक प्राथमिक गांधी आश्रम शाळा, श्री संजीव ढोपरे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाईकट्टी,महिला अध्यक्ष सौ श्वेता कालदीप,आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रतिष्ठान चे काम उल्लेखनीय असून तरुणांन पुढे एक आदर्श निर्माण केला आहे. माणसाने माणसाला मदत केली पाहिजे हीच खरी माणुसकीअसते.प्रतिष्ठान ने खरच सोलापूरतीन रत्न शोधून त्यांना पुरस्काराने सन्मानित केले ही खरी अभिमानची गोष्ट आहे. असे मत व्यक्त कदम यांनी माडले.
प्रस्ताविकात संस्थेचे महिला अध्यक्ष सौ श्वेता कालदीप यांनी प्रतिष्ठानच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा मांडला. सुत्रसंचालन गणेश येळमेली,सौ.सुनंदा भाईकट्टी यांनी केले तर आभार श्री महेश भाईकट्टी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवानंद भाईकट्टी,संतोष शिवशिंपी,शिवानंद नागणसुरे,गणेश कालदीप,सोमनाथ कालदीप,सचिन लोणी, अभिषेक दुलंगे,अजय हलकुडे,धनंजय ममदापुरे,
मल्लिनाथ गादगी,दिव्या कालदीप,मीनाक्षी शिवशिंपी,संगीता नागणसुरे,कविता येळमेली,कोमल लोणी,आदींनी परिश्रम घेतले.
● चौकट – यांचा झाला पुरस्काराने गौरव !
यावेळी
राहुल बिराजदार (समाजसेवक)अनीश सहस्त्रबुद्धे (उद्योजक) दौला ठेंगिल (डॉक्टर),प्रशांत जोशी (पत्रकार) अश्विनी तडवळकर (कलाक्षेत्र),संगीता गोटे (शिक्षिका), योगेश हवले(डेव्हलपर्स),अभिषेक शिरसीकर (वकील) श्वेता धर्माधिकारी (महिला पोलिस)आदी मान्यवरांचा अनुभव रत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे.
विशेष सत्कार
श्री राहुल तंबाके व कुमारी यशश्री आमणे या दोघांना विशेष सन्मान देऊन गौरव करण्यात आला..