सोलापूर येथील अक्कलकोट रोड स्थित श्री श्री राधा दामोदर मंदिर (इस्कॉन) सोलापूर तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही कोविड महामारीनंतर पहिल्यांदाच, शनिवार दिनांक 24 जून 2023 रोजी भव्य जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भव्य जगन्नाथ रथयात्रे करिता इस्कॉन संस्थापक आचार्य श्री भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे शिष्य, इस्कॉन पदयात्रा प्रमुख, महाराष्ट्र राज् पत्रकार संघाद्वारे जीवनगौरव सन्मानाने पुरस्कृत विश्वविख्यात कीर्तन सम्राट त्रिदंडी संन्यासी परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज, दक्षिण आफ्रिकेहून परम पूज्य राम गोविंद स्वामी महाराज आणि यासोबतच महाराष्ट्रातील विविध भागातून सुद्धा अनेक वरिष्ठ भक्तांची मांदियाळी सोलापूर येथे ये आहे. पूर्वी जगन्नाथ रथयात्रा फक्त जगन्नाथ पुरी पर्यंतच सीमित होती परंतु भारतातील – जगविख संत इस्कॉन संस्थापक आचार्य – भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या असीम कृपेने तीच जगन्नाथ रथयात्रा जगातल्या १६० हून अधिक देशांमध्ये काढल्या जात आहेत

या संपूर्ण सृष्टीचे स्वामी भगवान जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी समवेत सार्वजनि स्वरूपामध्ये, आपल्या रथावर आरूढ होऊन शहरातील रस्त्यांवर संपूर्ण प्राणीमात्रांना दर्शन देण्यासाठी येतात. ब्रम्हांडपुराणात सांगितले आहे की, जो व्यक्ती भगवान जगन्नाथांच्या रथयात्रा उत्सवाचे दर्शन करतो, रथावर आरूढ भगवंतांच्या स्वागतासाठी आदरपूर्वक उभा राहतो, जगन्ना भगवंतांच्या रथाची दोरी ओढतो, रथासोबत काही पावले चालतो त्याची सर्व दुःखे व पाप नष्ट होऊन जातात आणि त्याच्या जीवन समाप्तीनंतर त्याला वैकुंठ मिळते .