येस न्युज मराठी नेटवर्क : दरवर्षी स्वामीविवेकानंद जयंती व सुभाषचंद्र बोस जयंतीच्या दरम्यान १२ ते २३ जानेवारी मध्ये युवक सप्ताह साजरा केला जात असतो.त्यामध्ये आपण अनेक विद्यार्थी हिताचे कार्यक्रम घेतो आणि देशभरात मोठ्या उत्साहात आपण हा युवक सप्ताह साजरा करत असतो.यंदा अभाविप,डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर च्या वतीने युवक सप्ताहा निमित्त भव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आला आहे यामधील खो खो या स्पर्धेचं सुरुवात आज श्रीकांत ढेपे, सत्येनं जाधव ,रितेश चौधरी यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून राष्ट्रीय खेळाडू श्रीकांत ढेपे व प्रमुख उपस्तिथी त्यांनी अखिल भारतीय विध्यार्थी परिषद ने covid-19 च्या काळानंतर खो खो स्पर्धांचे आयोजन केले ही खुओ छान बाब आहे मैदानी खेळांना वाव मिळण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने खूप छान स्पर्धेचे आयोजन केले म्हणून श्रीकांत ढेपे यांनी अभाविप चे आभार मानले जिल्हा शासकीय क्रीडा मार्गदर्शक सत्यन जाधव सर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी अभाविप चे कौतुक केले रितेश चौधरी यांनी अभाविप महाराष्ट्र प्रांत एकलव्य आयाम या बद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमाची प्रस्तावना धरती शहाबादे यांनी केली तर अभाविप महाराष्ट्र प्रांत एकलव्य आयाम संयोजक रितेश चौधरी यांनी एकलव्य आयाम बद्दल माहिती दिली तर सूत्रसंचलन प्रज्ञा काकडे यांनी तर आभार उर्वी पटेल यांनी मानले.यावेळी विविध संघाचे खेळाडू व परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.