सोलापूर – जिल्हा क्रिकेट असोसिएशन मार्फत 14 वर्षाखालील मुलांचे एक दिवसीय सामने भंडारी मैदान जुळे सोलापूर या ठिकाणी आज पासून सुरू झाले आहेत. या स्पर्धा सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी खजिनदार कै. जे.टी. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ सुरू केल्या आहेत.
या स्पर्धा शांभवी कन्स्ट्रक्शन ने पुरस्कृत केल्या आहेत.
25 जून 2025 रोजी या स्पर्धेचे उदघाटन शांभवी कन्स्ट्रक्शन चे मालक युवराज मुटकुळे यांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जितेश कुलकर्णी उपस्थित होते. याप्रसंगी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबार्सो, 14 वर्षाखालील निवड समितीचे चेअरमन राजेंद्र गोटे, सदस्य विक्रांत पवार, सदस्य सत्यजित जाधव, टूर्नामेंट कमिटी चेअरमन संजय वडजे, खजिनदार संतोष बडवे, 23 वर्षाखालील मुलांचे निवड समिती चेअरमन शिवानंद अकलूजकर, योगेश कोम्पल, निलेश गायकवाड, राजू रंगम हे उपस्थित होते.
स्पर्धा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत म्हणून स्पर्धा सुरू करण्यात आली. आजचा सामना विहान क्रिकेट क्लब विरुद्ध केपीसी सी यांच्या दरम्यान सुरू झाला