सोलापूरकरांनी ऑनलाईन खरेदी पेक्षा प्रत्यक्ष खरेदीला महत्त्व द्यावे – शितल तेली उगले
सोलापूर : सध्या ऑनलाईन खरेदीचा टक्का वाढत आहे सोलापूरच्या ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी कडे लक्ष न देता सध्या होम मैदानावर सुरू असलेल्या इलेक्ट्रो प्रदर्शनामधून आपल्या गरजेच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करून सोलापूर मधला पैसा सोलापुरातच फिरता ठेवावा असे महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले यांनी व्यक्त केले. इलेक्ट्रो 2025 च्या उद्घाटन प्रसंगी होम मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
साेलापूर इलेक्ट्राॅनिक्स डिलर्स असाेसिएशन द्वारा इलेक्ट्राेनिक्स, काॅम्प्यूटर्स, टेलिकम्युनिकेशन, हाेम अॅप्लायन्सेस, साेलार व फिटनेस इक्विपमेंटस वस्तूंचे भव्य प्रदर्शन ‘‘इलेक्ट्राे 2025’’ प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार दि. 12 फेब्रुवारी राेजी सायं. 5 वा. महापालिका आयुक्त साै. शीतल तेली उगले यांच्यासह श्री वसंत जाेशी, बिझनेस हेड, शार्प बिझनेस सिस्टमस् इंडिया लि. यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. दि. 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत हाेम मैदानावर हे प्रदर्शन आयाेजित करण्यात आले आहे. यंदा इलेक्ट्राे प्रदर्शनाचे शार्प हे मुख्य प्रायाेजक असून हायफा इलेकट्रीकल्स व एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी हे सह प्रायाेजक आहेत.अध्यक्ष आनंद येमुल बाेलताना म्हणाले की इलेक्ट्राे 2025 चे हे 25 वे वर्ष असून 24 वर्षापूर्वी 27 स्टाॅल्सने सुरु झालेले हे प्रदर्शन आज जवळपास 300 स्टाॅलचे प्रदर्शन झाले असल्याचे सांगतिलेे. आतापर्यंत इलेक्ट्राेने केलेल्या कामाची व ग्राहकांची दिलेल्या प्रतिसादाची ही पावतीच आहे असे येमुल यांनी सांगितले.
इलेक्ट्राे चेअरमन दिपक मुनाेत यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की यंदा प्रथमच 5 वेगळे जर्मन हँगर प्रकारच्या डाेम मध्ये हे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. क्युआर काेडद्वारे सर्व सहभागी स्टाॅलची माहिती ग्राहकांना आपल्या माेबाईलवर पाहण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती दिली. काही स्टाॅल्स् सामाजिक संघटनांना विनामुल्य देण्यात आलेली आहेत.या प्रदर्शनात खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी दरराेज लकी ड्राॅद्वारे आकर्षक बक्षिसे व शेवटच्या दिवशी 7 दिवसांत खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी बंपर ड्राॅमध्ये आकर्षक बक्षिस असल्याची घाेषणा करण्यात आली.
प्रारंभी आयुक्त साै. शीतल तेली उगले व श्री. वसंत जाेशी यांच्या शुभहस्ते द्विप प्रज्वलन करण्यात आले.मान्यवरांच्या शुभहस्ते इलेकट्रो २०२५ व्ही माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात aale. श्री जाेशी यांनी आपल्या भाषणात अश्या प्रकारचे एखाद्या व्यवसाईक संघटनेच्या अधिपत्याखाली हाेणारे हे प्रदर्शन संयाेजकांचे प्रशंसा करावी तेवढी कमी आहे असे गाैरवाेद्गार काढले. फीत कापून प्रदर्शन सर्वांसाठी खुले करण्यात आले. याप्रसंगी 7 दिवस चालणाèया इलेक्ट्राे 2025 दरराेज दु. 4 ते रा. 9.30 व रविवारी स.11 ते रा. 9.30 पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, कॉम्पुटर्स, टेली कम्युनिकशेन्स ,हेल्थ इक्वीपमेंट, सोलर प्रॉडक्ट्स इत्यादी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. अशा या प्रदर्शनामध्ये ठिकठिकाणी शुध्द पिण्याचे पाणीची साेय केलेली आहे. सर्व स्टाॅल मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कंपनी कडून ट्रेनिंग देवून ग्राहकांना माहिती देण्यात येते. रक्तदान प्रसार करण्याकरीता दरराेज रक्तदान शिबीराचेही आयाेजन करण्यात आले असून अवयव दान विषयी जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती सचिव भुषण भुतडा यांनी दिली.
प्रारंभी सचिव भूषण भुतडा यांनी स्वागत केले तर उपाध्यक्ष डॉ सूरजरतन धूत यांनी आभार प्रदर्शन केले. सुत्रसंचालन स्वाती अग्निहोत्री केले.
या कार्यक्रमास सह सचिव हरीष कुकरेजा, खजिनदार सुयाेग कालाणी , संस्थेचे माजी अध्यक्ष सतिश मालू, केतन शाह, समिर गांधी, विपीन कुलकर्णी ,जितेंद्र राठी, काैशिक शाह , खुशाल देढीया, ईश्वर मालू सह संचालक सर्वश्री संदेश काेठारी, राजेश जाजु, चंद्रकांत शाहपुरे, रवि पाचलग, बसवराज नवले, यल्लपा भाेसले, गणेश सुत्रावे सह सदस्य विजय टेके , पवन मुंदडा, सचिन करवा, दत्तात्र्य अंबुरे, जाॅय छाबरिया आदी उपस्थित होते.






