सोलापूर : रोटरी ई-क्लब ऑफ सोलापूर इलाईटचा नवीन कार्यकारिणी पदग्रहण सोहळा दिमाखदार वातावरणात IMA हॉल, डफरीन चौक, सोलापूर येथे संपन्न झाला. रोटरी वर्ष २०२५-२६ साठी नवनियुक्त अध्यक्ष रोटेरियन इंजि. बालमुकुंद राठी आणि सचिव रोटेरियन रोशन भुतडा यांनी आपापल्या पदाची सूत्रे स्वीकारली. यासोबतच संचालक मंडळाची घोषणा देखील करण्यात आली.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून PDG रोटेरियन स्वाती हेरकल (DRFC) उपस्थित होत्या. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सन्माननीय अतिथी म्हणून PP रोटेरियन डॉ. ज्योती चिडगुपकर (Assistant Governor) यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
नवीन अध्यक्ष रोटेरियन इंजि. बालमुकुंद राठी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “सेवेच्या या प्रवासात नव्या जोमाने काम करत समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहील.” सचिव रोटेरियन रोशन भुतडा यांनी क्लबची कार्यपद्धती अधिक सुसंगत आणि आधुनिक करण्यावर भर देण्याचे सूचित केले.
या वेळी रोटरी वर्ष २०२५-२६ साठीचे संपूर्ण कार्यकारी मंडळ जाहीर करण्यात आले, ज्यात विविध अनुभवी व ऊर्जावान सदस्यांचा समावेश आहे:
President Elect – रोटेरियन संदीप कुलकर्णी
Club Trainer – PP रोटेरियन वेंकटेश सोमानी
Club Administration – रोटेरियन अमित इनानी
Treasurer – रोटेरियन राहुल डांगरे
TRF – रोटेरियन प्रसाद कुलकर्णी
Community Service (Medical) – रोटेरियन डॉ. अवधूत डांगे
Community Service (Non-Medical) – रोटेरियन इंजि. सुयोग कलानी
Public Image – रोटेरियन मयूर दरगड
Youth Service – रोटेरियन श्रीकांत असावा
Vocational Service – रोटेरियन डॉ. सौरभ धोपरे
Environment – रोटेरियन इंजि. सौरभ कुलकर्णी
Cultural – रोटेरियन संदीप असावा
Sports – रोटेरियन बसवराज उमबर्जे
Editor – रोटेरियन आदर्श गोयदानी
R.I. Emphasis – PP रोटेरियन इंजि. अजय डोईजोडे
WINS – PP रोटेरियन डॉ. केदार कहाते
Permanent Project/Diversity Equity Division – PP रोटेरियन अतुल सोनी
SGT at Arms – रोटेरियन जय खडलोया
IPP – PP रोटेरियन सचिन तोष्णीवाल
Club Action Champion – PP PP रोटेरियन राजन वोरा
या सोहळ्यास R.I. President रोटेरियन फ्रान्सेस्को अरेझ्झो आणि District Governor रोटेरियन सुधीर लटुरे यांचे विशेष संदेश लाभले.
“UNITE FOR GOOD” या तत्त्वानुसार क्लबने सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचा संकल्प यावेळी घेतला.
यामुळे क्लबचे पर्यावरणपूरक विचार स्पष्ट दिसून आले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थित सदस्य व पाहुण्यांनी नवनिर्वाचित टीमला पुढील वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.