समाधान रोकडे/सोलापूर : 4 जानेवारी गाव करी ते राव करी या म्हणीनुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी या गावातील ग्रामस्थांनी विजेचा प्रश्न कायम स्वरूपी मिटवन्याच्या उद्देशाने आमदार यशवंत माने यांच्यावर विश्वास दाखवित ग्रामपंचायत स्थापनेपासून कधी ही बिनविरोध न झालेली ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात यश मिळवले. यामुळे तालुक्यात व जिल्ह्यात पडसाळी गावाने एक आदर्श निर्माण केला आहे.
ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी गावातील अनेक ग्रामस्थाने यामध्ये भाग घेतला यामध्ये भागवत सिरसट, सुधाकर अण्णा सिरसट,नानासाहेब सिरसट, सकाळचे पत्रकार संतोष सिरसट, माजी सरपंच जितेंद्र भोसले, दत्ता पाटील लंकेश्वर पाटील, सयाजी गायकवाड महादेव भोसले, धर्मा रोकडे, विशाल शिंदे तसेच भीमराव ढेकणे तसेच सर्वात जास्त महत्त्वाची भूमिका पार पाडली ती गावातील ग्रामस्थांनि. बिनविरोध झालेल्या उमेदवार अजितसिरसट, स्वाती सिरसट, धर्मा रोकडे, माणिक राऊत, जोशना पाटील, शिमिताबाई भोसले, महादेव भोसले, रेणुका माळी व तब्बूसून शेख हे आहेत. यावेळी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करीत नूतन सदस्यांचे अभिनंदन केले.