शालेय मुलांना मोफत शिक्षण.. पाठ्यपुस्तके.. पोषण आहार याचबरोबर आता राज्य सरकार स्कूल बॅग देखील मोफत देणार आहे. राज्यातील जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या सुमारे 41 लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. यासाठी 165 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. गरीब मुलांना याचा नक्की फायदा होणार असून मुलांमध्ये शाळेची गोडी वाढावी तसेच गळतीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे शाळकरी मुलांना आता लवकरच चांगल्या दर्जाच्या स्कूल बॅग मोफत मिळतील हे नक्की.
