येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरात विविध विभागांमध्ये आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी मध्ये समन्वयाचा किती आभाव आहे हे शहरात सुरू असलेल्या विविध कामांवरुन दिसून येते. ड्रेनेज.. पाणीपुरवठा.. स्टोम वॉटर ड्रेन… गॅस पाईपलाईन आदींच्या विविध कामासाठी तेच ते रस्ते वारंवार खोदले जात आहेत यामुळे चांगले रस्ते खराब होत असून वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे शिवाय शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर वाढले आहे जुना एम्प्लॉयमेंट चौकातील हॉटेल कामत जवळी् दोन्ही रस्ते गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार खोदले आहेत पुन्हा एकदा याठिकाणी खोदकाम सुरू झाल्यामुळे शहरवासीय स्मार्ट सिटी च्या कामाला वैतागले आहेत