उजनीत 100 टीमसी साठा..
बेंबळे(प्रथमेश शिंदे) : गेल्या महिनाभर साठीच्या आसपास थांबलेला उजनी धरणातील पाणी साठा मागील तीन दिवसांपासून पुन्हा हळूहळू वाढीस लागला आहे. आज सायंकाळी 6 वाजता उजनी धरण सत्तरी च्या उंबरठ्यावर आले असून 68.48 टक्के पाणी साठा झालेला आहे. पुणे जिल्ह्यातून येणारा विसर्ग कायम असल्याने सकाळ पर्यंत धरण सत्तरी पार करेल अशी शक्यता आहे.
यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीलाच झालेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरणांत 25 जुलै च्या दरम्यान 63.42 टक्के इतका पाणी साठा झाला होता.मात्र त्या नंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने धरणातील पाणी साठा 60 टक्के पर्यंत खाली आला होता.
दरम्यान, मागील 4 दिवसांपासून भीमा खोऱ्यात हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील वरसगाव, चासकमान, कळमोडी, आंध्रा, कासारसाई या धरणांतून सुमारे 10 हजार क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. परिणामी उजनी धरणाने पुन्हा सत्तर टक्केच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे.
आज सकाळी धरणात 67.32 टक्के पाणी साठा झाला असून दौंड येथे येणारा विसर्ग 11 हजार 786 क्यूसेक्स इतका होता.त्यात वाढ होवुन तो 12703 झाला आहे. त्यामुळे उद्या सकाळ पर्यंत धरण 70 टक्केच्या पुढे वाटचाल करेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणे 90 टक्केहून अधिक भरली आहेत, त्यामुळेच चार दिवस पाऊस झाला तरीही उजनी 100 टक्केला जाईल असे मानले जात आहे.
वीर सह भीमेच्या खोऱ्यातील 9 धरणांतून पाणी सोडले.
पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे आज दुपारी विर धरणातून नीरा नदीला पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान आज सकाळी 8 वाजता भीमा नदीच्या खोऱ्यातील 9 धरणांतून 14 हजार 545 क्यूसेक्स चा विसर्ग सुरू झालेला आहे.
तर भीमा नदीच्या खोऱ्यातील खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव, पवना, आंध्रा, चासकमान, कळमोडी, वडज या 9 धरणांतून 14 हजार 545 क्यूसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे. त्यामुळेच भीमा नदीचा विसर्ग वाढून उजनीच्या पाणी साठ्यात वेगाने वाढ होणार आहे.
वीर मधुन 13 हजार क्यूसेक्स
नीरा खोऱ्यातील सर्व धरणे 100 टक्के भरली
दरम्यान आज सकाळी 8 वाजता भीमा नदीच्या खोऱ्यातील 9 धरणांतून 14 हजार 545 क्
भाटघर:-100 टक्के भरले आहे. धरणातून 8624 क्यूसेक्स विसर्ग चालू आहे.
निरादेवघर:-100% भरले आहे आणि धरणातून 5110 क्यूसेक्स विसर्ग चालू आहे.
गुंजवणी:-100 टक्के भरले आहे तर 998 क्यूसेक्स विसर्ग सुरू केला आहे.
वीर 100% भरले असून
धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करून संध्याकाळी 5.00 वाजता 13911 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत असून वीर धरण 100 टक्के भरले आहे.वीर धरणाच्या सांडव्यातून आज दुपारी 2.00 वाजता 4637 क्युसेक चाविसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यात विरमधुन नीरा नदीला पाणी सोडण्यात आलेला विसर्ग वाढवून 13 हजार911 क्यूसेक्स करण्यात आला आहे.
उजनी धरणातील पाणीपातळी ६ वा.
एकूण पाणीपातळी – ४९५.३१० मीटर
एकुण पाणीसाठा – २८४१.७४ (१००.३४टी.एम.सी)
उपयुक्त साठा – १०३८.९३ दलघमी ( ३६.६८टी.एम.सी.)
टक्केवारी – ६८.४८टक्के
दौंड..१२७०३
बंडगार्डन ..१४५४५