येस न्युज मराठी नेटवर्क : जुळे सोलापुरात नाट्यगृह व्हावे ही बऱ्याच दिवसापासून ची मागणी मंजूर झाली आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जुळे सोलापुरात होणाऱ्या सांस्कृतिक भवनासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. शिवाय 20 ते 28 जानेवारी दरम्यान सोलापुरात नाट्य संमेलन होणार असून त्याचे स्वागत अध्यक्ष पद देखील पालकमंत्र्यांनी स्वीकारले आहे. या नाट्य संमेलनासाठी अडीच कोटी रुपयांची वैयक्तिक निधी देखील चंद्रकांत दादांनी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे जुळे सोलापुरात होणाऱ्या सांस्कृतिक भवनासाठी महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांना फोन करून या सांस्कृतिक भवनासाठी तातडीने आराखडा करा असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
अखिल भारतीय नाट्य परिषदेने आयोजित केलेल्या या बैठकीसाठी बार्शीचे आमदार राजा राऊत विजय साळुंखे, राजा माने, उद्योजक दत्तांना सुरवसे, ऍड.जेजे कुलकर्णी, पद्माकर कुलकर्णी, शहाजी पवार, मोहन डांगरे, वैशाली गुंड, प्रशांत बडवे, शोभा बोली यासह नाट्यप्रेमी उपस्थित होते.