दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. या यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येत असतात. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून 10 लाखांवर भाविक येण्याची शक्यता आहे.
चांगभलं! जोतिबा डोंगरावर लाखो भक्तांची मांदियाळी; अमाप उत्साहात आज यात्रेचा मुख्य दिवस
दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे.
चांगभलं! जोतिबा डोंगरावर लाखो भक्तांची मांदियाळी; अमाप उत्साहात आज यात्रेचा मुख्य दिवस या यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येत असतात.
तसेच या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून 10 लाखांवर भाविक येण्याची शक्यता आहे.
या यात्रेचं प्रमुख आकर्षण असतं ते म्हणजे मानाच्या सासनकाठ्या.
ही यात्रा बघण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी पार्किंग व्यवस्था आणि दर्शन रांगांसाठी मोठी तयारी केली आहे.
यावेळी कोणतेही निर्बंध नसल्याने गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाट, वडणगे, निगवे, कुशिरे, पोहाळे, गिरोली, दाणेवाडी या भागातील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.
सनई, पिपाणीच्या सुरामध्ये सासनकाठ्या नाचत डोंगराकडे रवाना झाल्या. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मंदिरासह संपूर्ण गावात व घाट रस्त्यावर कडक सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. जलद कृती दल, व्हाईट आर्मी, घातपात विरोधी पथके, तसेच सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते डोंगरावर सज्ज आहेत.