दुबई : येथील एका रेस्टॉरंट 22 कॅरेट गोल्ड प्लेटेड वडापाव समाविष्ट केला आहे या वडापाव ची किंमत दोन हजार रुपये आहे. दुबईमध्ये सोने म्हणजे लोकांचा जीव की प्राण.
खाण्यापिण्याची भांडी ,कपडे, वाहने , घड्याळे या सर्वांमध्ये सोन्याचा वापर करण्यात येतो . संयुक्त अरब अमिराती तील अल करामा येथील ‘ओ पावो ‘ या रेस्टॉरंटमध्ये मेनू कार्ड मध्ये गोल्ड प्लेटेड वडापाव समाविष्ट केला आहे. जगातील पहिला 22 कॅरेट गोल्ड प्लेटेड वडापाव आहे. हा वडापाव बनवण्यासाठी ट्रिपल बटर आणि चीजचा वापर केला आहे. हा वडापाव 22 कॅरेट सोन्याच्या वर्क मध्ये गुंडाळला जातो त्यामुळे त्याची किंमत दोन हजार रुपये होते.