मुंबई : सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीत तेजी पाहायला मिळत आहे. मागणी वाढल्यामुळे सोने-चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. असं असलं तरी सोने आणि चांदीच्या मागणीत मात्र घट झालेली नाही. सध्या लग्नसराईचा काळ सुरु असल्याने सोने-चांदीला मोठी मागणी आहे. आज सोन्याच्या दराने 64 हजारांचा आकडा पार केला आहे. तर चांदीचा भाव 80 हजारांच्या पुढे पोहोचला आहे.
सोन्याच्या दरात सध्या प्रचंड वाढ होताना दिसत आहे. सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीने प्रति औंस 2,100 डॉलरची पातळी ओलांडली आहे. आज आंतरराष्ट्रीच बाजारात सोनं 2,146 डॉलर प्रति औंस ही सर्वोच्च पातळी गाठली आहे. जागतिक पातळीवर सोन्याच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम भारतीय बाजारांवर दिसून येत आहे. फ्युचर्स मार्केट म्हणजेच MCX वर 24 कॅरेट सोन्याचा दर 64,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका वाढला आहे. एमसीएक्समध्ये सोन्याचा भाव 64,000 च्या पातळीवर दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मुंबईत आज सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी 5,885 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 6,420 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज सोन्याच्या दरात 440 रुपयांची वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 64,200 रुपये आहे. आज एक किलो चांदीचा दर 80,500 रुपये किलो आहे.