मुंबई : केंद्र सरकारचा यंदाच्या लोकसभा हंगामातील पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केला. त्यानंतर, सर्वांनाच उत्सुकता असलेल्या मौल्यवान वस्तुंच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यातच, सोन्याच्या दरात तब्बल 5 हजार रुपयांनी कमी झाला आहे. कस्टम ड्युटी तात्काळ प्रभावाने लागू होत असते, त्यामुळे अर्थमंत्री सितारमण यांनी बजेट सादर केल्यानंतर कस्टम ड्युटी कमी करुन ग्राहकांना सुवर्णसंधीच दिली आहे. त्यानुसार, राजधानी मुंबईत सोन्याचे दर तब्बल 5 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. तर, पुणे आणि जळगाव शहरातही 3 हजार रुपयांनी प्रतितोळा सोने दरात घट झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदी आनंद पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दरात मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे, ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली होती. आता, दर कमी झाल्यामुळे पुन्हा सोन्याच्या दुकाना ग्राहकांची गर्दी दिसून येईल.
सोन्याची स्टॅम्प ड्युटी कमी करण्यात आली आहे, ती 9 टक्क्यांवर खाली आली आहे. तसेच, जीएसटी व सेल्स टॅक्स मिळून कमीत कमी 6 टक्क्यांपर्यंत स्टॅम्प ड्युटी कमी झाली आहे. त्यामुळे, मुंबई 5 हजार रुपयांनी सोने स्वस्त झालं आहे. 22 कॅरेट सोन्याच्या भावात 5 हजार रुपयांची घट झाल्याचं गोल्ड असोसिएशनचे प्रवक्ते आणि मुंबईतील सुवर्ण व्यापारी कुमार जैन यांनी सांगितलं. आता लगीन सराईचा सिझन आहे, त्यामुळे सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होईल. सध्या पावसाळा असल्याने आणि सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांनी सोन्याकडे पाठ फिरवली होती.
नेमका काय बदल झाला?
सोने, चांदीवरील सीमा शुल्क – 6 टक्के
प्लॅटिनमवरील सीमा शुल्क- 6.4 टक्के
अमोनिअम नायट्रेटवरील सीमा शुल्क 7 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे.
तुमच्या शहरातील सोन्याचं नवे दर
सोलापूर
सोने
(आधी) – 73500
(नंतर) – 71500 (अंदाजे)
चांदी
(आधी) – 92000
(नंतर) – 91000 (अंदाजे)
बुलढाणा
चांदी – काल – 91650 प्रति किलो.
– आज – 84330 प्रति कीलो.
सोने – काल – 73000 प्रति 10 ग्रॅम.
– आज – 68000 प्रति 10 ग्रॅम.
वाशिम सोने चांदी दर
सोनं – आधी 73,500 आता 70,500
चांदी – आधी 92 हजार
आता – 86 हजार
परभणी
सोने
काल 73200 रुपये
आज 71000 रुपये
चांदी
काल-89500 किलो
आज-87500 किलो
अमरावती
सोनं – आधी 73400
आता 71300
चांदी – आधी 91000
आता – 88000
हिंगोली
सोने ( प्रती तोळा)
अगोदर 74000
आता 71700
चांदी( प्रती किलो)
अगोदर 92000
आता 88000
नांदेड
सोनं बजेट अगोदर होते 74,400
सोन बजेट नंतर :- 71800
चांदी बजेट अगोदर 91400
चांदी बजेट नंतर 88000

