येस न्युज मराठी नेटवर्क :(अविनाश व्यंकटेश कुलकर्णी) सोलापूर महापालिकेच्या इंद्रभुवन इमारतीचे सुशोभीकरण इंद्रभुवन इमारतीच्या सुशोभीकरणाचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पातून पूर्ण करण्यात आले असून त्यासाठी सव्वापाच कोटींचा खर्च करण्यात आला आहे इमारतीच्या मूळ रुपात कसलाही बदल न करता इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त इंद्रभुवन इमारत तिरंगा रोषणाईने उजळून निघाली आहे
भारतीय असंतोषाचे जनक अशी ओळख असलेल्या लोकमान्य टिळक यांच्या वास्तव्याने ही इमारत पुनीत झाली आहे सोलापूर शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी ही सुबक ,रेखीव व चित्ताकर्षक इमारत पुण्यश्लोक श्रीमंत कै मल्लप्पा बसप्पा वारद । आप्पासाहेब वारद ।यांनी बांधली या इमारतीचे बांधकाम 12 वर्षे चालले होते इंद्रभुवन इमारतीचे बांधकाम 1912 मध्ये पूर्ण झाले अप्पासाहेबांच्या कालाप्रियतेची साक्ष देणाऱ्या या इमारतीच्या बांधकामासाठी त्याकाळात 4 लाख 55 हजारांचा खर्च आला मुंबईच्या रेल्वे स्टेशनपासून ते निजामाच्या राजवाडा आदी प्रेक्षणीय इमारतील प्रेक्षणीय भाग या ठिकाणी पहावयास मिळतात या इमारतीत निरनिराळ्या कामासाठी निरनिराळे दगड वापरले आहेत अप्पासाहेबांच्या कालाप्रियतेची व सौंदर्यापासनेची मूर्तिमंत साक्ष म्हणजे इंद्रभुवन प्रासाद होय सर्व जगातील शिल्पकलेचे इंद्रभुवन हे प्रदर्शन असे या इमारतीचे वर्णन जुन्या काळातील कवींनी केले आहे ही इमारत उभारण्यासाठी अप्पासाहेबांनी सोलापुरातील कुशल कामगार व कलाकारांना 2वर्षे प्रशिक्षणासाठी जयपूर व अन्य ठिकाणी पाठविले होते ,असे सांगितले जाते बेसाल्ट , शहाब।दी , ग्रॅनाईट आदी दगडांचा वापर या अप्रतिम वास्तूच्या निर्मितीसाठी करण्यात आला आहे कलोनिय ल ,राजवाडा,युरोपियन आदी विविध शैलींचा वापर केल्यामुळे ही इमारत देखणी झाली आहे अप्पासाहेबांनी विविध ठिकाणच्या आकर्षक इमारती पाहून त्यातील आवडलेले सुंदर नक्षीकाम या इमारतीत समाविष्ट केल्यामुळे ही इमारत चित्ताकर्षक झाली आहे विविध फळांचे ,मगर ,सुसर आदी प्राण्यांचे , देवतांचे नक्षीकाम करून मोठ्या कौशल्याने या इमारतीत कलाविष्कार सादर केलेला दिसतो या इमारतीचे काम पूर्ण होण्याअगोदर 19 जानेवारी 1911 रोजी आप्पासाहेब यांचे निधन झाले आप्पासाहेब व लोकमान्य टिळक यांची घनिष्ठ मैत्री होती लोकमान्य सोलापुरात आल्यानंतर त्यांचा मुक्काम अप्पासाहेबांच्या निवासस्थानी असे तर आप्पासाहेब हवापालट करण्यासाठी टिळक यांच्या निवासस्थानी मुक्काम करीत असत स्वदेशी कापड निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी आप्पासाहेब वा र द यांना हैद्राबादचे राजा ग्यानी गिरजी यांच्या भागीदारीत एन जी मिल ही कापड गिरणी सुरू करायला लावली होती
अखिल भारतीय काँग्रेसने होमरू ल । स्वराज्य । पाठींबा देण्याचा ठराव मंजूर केला तेव्हा काँग्रेसमधील नेमस्तांनी त्या ठरावाला लोकांचा पाठिंबा नाही असा गदारोळ उडविला या ठरावाला जनतेचा पाठिंबा आहे हे दाखवण्यासाठी 1920 मध्ये सोलापुरात कै न चि केळकर यांच्या अध्यक्षतेखाली इंद्रभुवन च्या आवारात प्रांतिक परिषद घेण्यात आली होती या परिषदेत स्वतः लोकमान्य टिळक यांनी उपस्थित राहून स्वराज्यासाठी आग्रह धरला होता या परिषदेत शिवरमपंत परांजपे , डॉ सावरकर , खापर्डे , भोपटकर , ब्यापटिस्ट। आदींनी होमरू लचे प्रभावी समर्थन केले होते इंद्रभुवन इमारतीच्या पूर्वीच्या आयुक्त कार्यालयात या परिषदेच्यावेळी लोकमान्य टिळक यांचे वास्तव्य होते त्यामुळे इंद्रभुवन इमारत व परिसराला ऐतिहासिक महत्व आहे , हे विसरता येणार नाही आबासाहेब वा रद यांचे 1911 मध्ये निधन झाले त्यावेळी लोकमान्य टिळक मं डा ले येथील तुरुंगात होते त्यादिवशी लोकमान्य टिळक यांनी अन्नग्रहण केले नाही त्यांनी तुरुंगातून वा र द कुटुंबियांना सांत्वनपर पत्र पाठवून दिले त्याची सुरुवात त्यांनी पुण्यश्लोक आप्पासाहेब वा र द अशी केल्यामुळे अप्पासाहेबांच्या नावा अगोदर पुण्यश्लोक असे लिहिले जाते कै आप्पासाहेब वा र द यांना विनम्र अभिवादन….
1 मे 1964 पासून इंद्रभुवन इमारतीत सोलापूर महापालिकेचे कामकाज सुरू झाले तत्पूर्वी या इमारतीत न्यायालय होते काही दिवस ह दे प्रशालेचे वर्ग या इमारतीत भरत होते