कोंडी : जिजाऊ ज्ञानमंदिर इंग्लिश मिडियम स्कूल, कोंडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रथम सावित्रीबाईच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याकार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अर्चना गुंड ,प्राचार्या सुषमा नीळ, मुख्याध्यापक वैभव मसलकर, अर्चना औराद, महादेवी माने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाईच्या कार्याची माहिती सांगितली. तसेच माता सावित्रीची ओवी, कविता यांचे सादरीकरण करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी कर्तबगार महिलांच्या वेशभूषा करून आल्या होत्या.प्राचार्य सुषमा नीळ यांनी बालिका दिनाचे महत्व सांगितले.
तसेच बालिका दिनाचे औचित्य साधून मुलींसाठी निर्भया पथक व जाणीव फौंडेशन मुंबईचे संस्थापक मिलिंद पोक्षे,गौरी मॅडम,सोलापूर पोलिस ग्रामीणच्या फरीद शेख मॅडम उपस्थित होते.
मुलींना स्वरक्षण, करियर, चांगले-वाईट स्पर्श,सोशल मीडियाचा वापर कसा व कुठपर्यंत करायचा अशा अनेक विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. मुलींनी निडरपणे कसे आयुष्य जगायचे हे शेख मॅडम यांनी सांगितले.याकार्यक्रमाचे प्रास्ताविक शीतल कांबळे यांनी केले. तसेच सुत्रसंचलन प्रियांका नीळ यांनी केले तर आभारप्रदर्शन शिंदे मॅडम यांनी केले.