येस न्यूज मराठी च्या वृत्तसंपादक पदी गिरीश गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पत्रकारितेच्या बदलत्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करत पत्रकारितेमध्ये नवा मानदंड निर्माण केलेल्या येस न्यूज मराठी च्या वृत्तसंपादक पदी ज्येष्ठ पत्रकार गिरीश गोरे यांची नियुक्ती संपादक शिवाजी सुरवसे यांनी केली .गोरे यांनी आज वर दैनिक संचार केसरी गावकरी स्वराज्य आधी दैनिकांमध्ये पत्रकारिता केली आहे. येस यूज मराठीच्या यूट्यूब चैनलचे 260000 सबस्क्रायबर असून आजवर तब्बल पावणे सात कोटी दर्शक संख्या मिळाली आहे. तसेच फेसबुक पेज आणि मराठीच्या पोर्टलला देखील दररोज हजारो लोक पाहतात.