सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर यांच्यावतीने बालाजी अमाईन्स चे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांचे कडे सोलापूर जिल्हयातील १० वीच्या विद्यार्थ्यांना २१ अपेक्षित संच मिळावे अशी मागणी केली होती.
बालाजी अमाईन्सच्यावतीने सीएसआर अंर्तगत सोलापूर जिल्हयातील १४ शाळा व धाराशिव जिल्हयातील ११ शाळा एकूण २५ शाळांमधिल १० वी च्या विदयार्थ्यांकरीता २१ अपेक्षित संचाचे वितरण आज सकाळी बालाजी अमाईन्सच्या होटगी रोड येथिल कार्यालयात २१ अपेक्षित संच भेट देण्याचा कार्यकम संपन्न झाला. सोलपूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री तानाजी माने सर यांनी बालाजी अमाईन्सच्या वतीने सोलापूर जिल्हयातील १४ शाळां मधिल विदयार्थ्यांना २१ अपेक्षित संच दिल्या बददल बालाजी अमाईन्सच्या व्यवस्थापकीय संचालक व संचालक मंडळाचे आभार मानले तसेच मागिल वर्षी अपेक्षित संच दिल्यामुळे विदयार्थांना मदत झाली असे विचार व्यक्त केले.
बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांनी या वेळी मार्गदर्शन करताना बालाजी अमाईन्सच्यावतीने सीएसआर अंर्तगत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहीती दिली. जिल्हयातील गरीब व होतकरू विदयार्थान मदत व्हावी या उद्देशाने बालाजी अमाईन्स दरवर्षी शहरी व ग्रामिण भागातील विविध शाळांना १० वी चे २१ अपेक्षित संच मदत करत आहे असे नमूद केले.
या कार्यक्रमास बालाजी अमाईन्सचे तांत्रिक सल्लागार मल्लिनाथ बिराजदार सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघा अध्यक्ष तानाजी मानेसर, शंकर वडणेसर, विष्णु मस्के, सर ,वांगीसर, गवळीसर, सरवदे सर, गुरवसर ,कालिदास गावडेसर, काळेसर, व पदाधिकारी तसेच बालाजी अमईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर हे उपस्थित होते
सोलापूर शहरातील व जिल्हयातील १४ शाळा
सोलापूर शहर.
. 1, शरदचंद्र पवार प्रशाला अवंती नगर सोलापूर
2, छत्रपती शिवाजी प्रशाला सरस्वती चौक सोलापूर
- जैन कुकूल प्रशाला सोलापूर
4, एस के बिराजदार प्रशाला शेळगी सोलापूर - अण्णापा काडादी प्रशाला सोलापूर.
उत्तर सोलापूर तालुका - शिवप्रभु माध्यमिक प्रशाला अकोलेकाटी
- श्री गणेश विदयालय बीबीदारफळ,
8, नालंदा माध्यमिक आश्रम शाळा भोगाव,
9, ब्रह्मा गायत्री विद्यामंदिर रानमसले
10, न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडाळा.
11, समता विद्यालय सावळेश्वर तालुका मोहोळ - श्री दत्त प्रशाला मोहोळ
13, अंबिका विद्या मंदिर शिरपूर तालुका मोहोळ