येस न्युज नेटवर्क । आंदोलक शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घेण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होताना दिसत असून, राज्यसभेतही यांचे तीव्र पडसाद उमटले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याची मागणी विरोधकाकडून करण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी १५ वेळ राखून ठेवण्यावर एकमताने संमती झाली. मात्र, त्यापूर्वी ‘आप’च्या खासदारांनी राज्यसभेत घोषणा देत गोंधळ घातला. त्याच्यावर सभापतींनी कारवाई करत निलंबित केले.
विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. त्यावरून सभागृहात बराच गदारोळ झाला. अखेर विरोधकांच्या मागणीची दखल घेत सभापतींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी १५ तासांचा वेळ राखून ठेवला. मात्र, ही चर्चा सुरू होण्यापूर्वी आप खासदारांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभापती व्यंकय्या नायडू यांनी तीन खासदारांना एका दिवसासाठी निलंबित केलं. २५५ नियमानुसार सभापतींनी आपच्या तीन खासदारांवर कारवाई केली.