येस न्युज नेटवर्क : राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे. अशातच कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यांनी आंरवाली सराटीत उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यावेळी शाहू महाराजांना शब्द देत, राजांचा मान राखून दोन दिवस पाणी पिणार, दोन दिवसांत आरक्षण मिळालं नाहीतर पुन्हा पाणी सोडणार, असं म्हटलं आहे.
शाहू महाराज छत्रपतींनी घेतली मनोज जरांगेंची भेट घेतली आणि सर्व मराठा आंदोलकांना त्यांनी आवाहन केलं आहे. एकाही मराठ्यानं आत्महत्या करू नये, असं शाहू महाराजांनी म्हटलं आहे. शाहू महाराज सोबत तर कोणाचीही भीती नाही, असं मनोज जरांगेही म्हणाले आहेत. तर शाहू महाराजांचा मान राखत जरांगेंनी दोन दिवस पाणी पिणार असल्याचंही सांगितलं आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना राज्यभरातून अनेक नेते श्रीमंत शाहू महाराजांनी आंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. छत्रपती घराण्यातील माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी भेट घेतल्यानंतर आज कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी शाहू महाराजांनी सरकारला आपला शब्द ऐकावाच लागेल, असं स्पष्टच सांगितलं. तसेच, तब्येतीची काळजी घेण्याची विनंती मनोज जरांगेंना शाहू महाराजांनी केली.