सोलापूर- जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून सोलापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व प्राथमिक शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये सायकल वाटप करण्यात आले. महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या संकल्पनेतून यंदा हा नवीन उपक्रम हाती घेण्यात आला असून यासाठी कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक यांच्या सीएसआर फंडातून आणि सरकारचे प्रशासकीय सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांच्या कन्येसह आदींचे सहकार्यने आज महापालिकेच्या शाळेतील इयत्ता आठवी आणि नववीतील शिकणाऱ्या 230 विद्यार्थिनींना आज कॅम्प शाळा येथे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या शुभहस्ते तर महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या प्रमुख उपस्थितीत सायकल वाटप करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त विद्या पोळ,उपायुक्त मच्छिंद्र घोलप,सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत, प्रशासन अधिकारी जाधवर, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे तसेच पंजाब नॅशनल बँकेचे देवेंद्र सिंह, मंजुनाथ कुलकर,ईशावली पिंजारी, नितीन शिंदे,अभिजीत इलग तसेच कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापक विशाल सूर्यगंध,संजय भुके, पवन भुसपुटे, मल्लेश नाराल आदी मान्यवर उपस्थित होते.महापालिकेच्या कॅम्प शाळेत आज सकाळी आठ वाजता जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून सर्वप्रथम सोलापूर महानगरपालिकेकडील प्राथमिक शिक्षण विभाग तसेच माध्यमिक विभाग, आरोग्य विभाग, मालमत्ता कर आदी विभागात काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर महापालिकेच्या सर्व शाळेतील आठवी आणि नववीच्या 230 मुलींना सायकल देण्यात आले. आठवी व नववी शिकणाऱ्या मुलींना प्रोत्साहन म्हणून हे उपक्रम घेण्यात देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल कस्तुरे तर सूत्रसंचालन श्रीमती गंगा शिंदे व स्नेहा पुजारी यांनी केले आभार प्रदर्शन रजनी राऊळ यांनी केली.