येस न्युज मराठी नेटवर्क : मानवी जीवन सुख दुःख इच्छा आकांक्षा अपेक्षा याने झाकोळलेले असून त्यातून सुटका करून घेऊन नित्य निरंतर चैतन्यपूर्ण आनंद पूर्ण स्थिती निर्माण करण्यासाठी आध्यात्मिक साधनेची नितांत गरज आहे असे विचार जीन डुईंग नेदरलँड यांनी व्यक्त केले.
ते इंचगिरी नवनाथ संप्रदायाचे साधक व दत्त संप्रदायाचे गाढे अभ्यासक व प्रचारक असुन नेदरलँड येथून भारतातील इंचगिरी नवनाथ संप्रदाय व दत्त संप्रदायाचे तत्त्व तत्त्वज्ञान तसेच नाममंत्र दीक्षा व साधना सत्संगाचे सेवा कार्य चालवितात. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे भाषांतर डच भाषेत करण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
सोलापूर सोलापुरातील दत्त चौकातील शुभराय मठ येथील सत्संगात ते बोलत होते. अद्वैत सिद्धांताचे त्यांनी सत्संगातून अतिशय सहज सुलभ पद्धतीनं उकल करून सांगताना ज्ञान प्राप्त करण्यासाठी अंतरीचा प्रवास अतिशय महत्त्वाचा आहे हे विशद केले सगुण व निर्गुण भक्ती ही अध्यात्मातील महत्त्वाची दोन अंगे असून सगुण भक्ति सोबत निर्गुण उपासनेतून साधकाला वास्तविक मोक्ष प्राप्ती होईल असेही ते म्हणाले.
साधना मार्गात येणाऱ्या विवीधांगी व नकारात्मक अनुभव हे तुम्ही साधना सुरू केल्यानंतर सद्गुरु ने केलेल्या तुमच्या अंतरंगातील शुद्धीकरण प्रक्रियेचे परिणाम असतात.
साधकाने दिलेली साधना नियमबद्ध व काटेकोरपणे केली पाहिजे त्यातूनच मायेच्या क्लृप्त्या ओळखून खऱ्या अर्थाने मोक्षप्राप्ती होऊ शकते असे त्यांनी समजावून सांगितले. नाशिक पुणे मुंबई सोलापूर अशा ठिकाणी त्यांच्या सत्संगाना उत्तम प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्रातील अन्य शहरात त्यांचे कार्यक्रम संयोजित होत आहेत. नाममंत्र दीक्षा देऊन ते साधना मार्गदर्शन करतात.