सोलापूर – चौधरी फौंडेशन च्यावतीने मंगळवारी दि १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ठिक ६.०० वाजता जुळे सोलापूरातील विलासचंद्र मेहता शाळेच्या प्रांगणात “गीत रामायण” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. गेल्या अनेक वर्षापासून चौधरी फौडेशनच्यावतीने अनेक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
सदर कार्यक्रमाचे निरुपण राम कथेच्या माध्यमातून प्रसिध्द निरुपणकार मा.विवेक घळसासी करणार आहेत. स्वरध्यास संगीत विद्यालय सोलापूरचे रसिका कुलकर्णी व सानिका कुलकर्णी हयांचा विशेष सहभाग असणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे याचा सोलापूर करांनी उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन चौधरी फौंडेशनचे चेतन चौधरी यांनी केले आहे.