आईमुळे माझ्या लिखाणात संवेदनशीलता आली – समीर गायकवाड
सोलापूर –प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमात शनिवारी, ०४ जानेवारी २०२५ रोजी लेखक समीर गायकवाड यांच्या “गौहर आणि गवाक्ष या पुस्तकाचे डॉ सुहासिनी शहा यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर लेखक समीर गायकवाड यांची माधव देशपांडे यांनी प्रकट मुलाखत घेतली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी समीर गायकवाड लिखित झांबळ आणि खुलूस या पुस्तकांचे अभिवाचन संदिप जाधव आणि आर जे अमृत ढगे यांनी केले. अभिवाचनानंतर पुस्तक प्रकाशन कार्यक्रम संपन्न झाला. सर्व मान्यवरांचे स्वागत डॉ सुहासिनी शहा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी फाउंडेशनच्या संचलिका स्नेहा सावे व सविता समीर गायकवाड उवस्थित होत्या.
डॉ सुहासिनी शहा या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी बोलताना म्हणाल्या कि, अतिशय मनाला भिडणारं लेखन समीर गायकवाड यांनी केल आहे. ह्या दोन पुस्तकांचं प्रकाशन प्रिसिजन वाचन अभियानात होत आहे हे प्रिसिजन आणि सोलापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानंतर लेखक समीर गायकवाड यांची प्रकट मुलाखत माधव देशपांडे यांनी घेतली. “झांबळ आणि खुलूस” या पुस्तकाविषयी बोलताना त्यांनी सांगितले कि माझ्या लिखानात संवेदनशीलता आली ती माझ्या आईमुळे, आईला झालेल्या त्रासातून, तिने केलेल्या संघर्षातून ही संवेदनशीलता आली.
पुढे बोलताना त्यांनी त्यांच्या लेखानाबद्दल सांगितले, सोलापूरपासून मुंबईमधील कामठीपुरा वैश्यावस्तीत पर्यंत कसे लेखन झाले याबद्दल त्यांनी सांगितले. सोलापूरमधील तरटी नाका परिसरात मेडिकल चालवत असताना ओळख झालेल्या एका मुलीच्या शोधातून ह्या लिखाणाचा प्रवास सुरु झाला. वैश्याव्यवसाय या विषयात खुलेपणाने कोणी बोलत नाही पण त्याबद्दल लिहणं हे खूप जिकिरीच होत.
लिखाणाच्या निमित्ताने रेडलाईट भागात फिरत असताना अशा अनेक घटना होत्या कि ज्याबद्दल पोलिसांना सांगिल्यावर पोलिसांनी खूपवेळी मदत करून मुलींना वाचविण्यात यश आले आहे. दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक अशा ठिकाणी पोलिसांना माहिती देऊन अनेक मुलींना या सर्व व्यवसायातून बाहेर काढण्यात मदत झाली.
पुस्तक लिहणायाची प्रेरणा ही वेगवेगळ्या वाचनातून आली आहे. चार पैकी आम्ही तीन भांवड लेखक आहोत त्याच्या मागची प्रेरणा ही पुस्तक वाचन आहे. झांबळ आणि गौहर हे पुस्तकामुळे सामान्य माणसाला अनभिन्न आसणाऱ्या विषयाचं वाचन करून अनुभवता आलं. हा सर्व संवाद ऐकताना प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः शहारे उभे राहिले. या मुलाखती दरम्यान लेखकांचे संवाद ऐकताना अनेक रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झालेल्या दिसल्या.
माझा वाचन प्रवास या उपक्रमांतर्गत प्रा. डॉ प्रदीप जगतापयांनी त्यांचा वाचन प्रवास मांडला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माधव देशपांडे यांनी व्यक्त केले.