पुणे : कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुसक्या आवळल्यानंतर आता पुणे पोलिसांनी आणखी एका कुख्यात गुंडाला अटक केली आहे. पुणे शहर पोलिसांनी गॅंगस्टर निलेश घायवळला मोक्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात विविध प्रकारचे 14 गुन्हे दाखल आहेत.
निलेश घायवळच्या संपूर्ण टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजली आहे. येरवडा कारागृहातूनच पुणे पोलिसांनी निलेश घायवळवर अटकेची कारवाई केली आहे.