सोलापूर- गेल्या २३वर्षांची परंपरा कायम राखत इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सने २४ व्या वर्षी गणरायाचे जल्लोषात स्वागत केले.
घोडे असलेल्या व सुंदर सजवलेल्या रथातून श्री गणरायाची मिरवणूक दावत चौकापासून सुरु झाली. पतंजली मार्ट, गोविंदश्री, डी-मार्ट या मार्गाने येऊन ही मिरवणूक शाळेत संपन्न झाली.
मिरवणुकीच्या सुरुवातीला आमदार सुभाषबापू देशमुख, पोलिस आयुक्त. मा. श्री एम. राजकुमार, मा. पोलिस उपायुक्त श्री. विजय कबाडे व इंडियन मॉडेल स्कूलचे अध्यक्ष ए.डी. जोशी सर, सचिव अमोल जोशी, सचिवा सायली जोशी ,ईशा जोशी,आर्य जोशी यांच्या हस्ते श्रींचे पूजन करण्यात आले.
उत्तम गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण देण्याबरोबरचे आपल्या संस्कृतीचा वारसा पुढील पिढ्यांमध्ये रुजवण्याचे कार्य इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सने कायम ठेवले आहे.
इंडियन मॉडेल स्कूल स्टेट बोर्ड, सीबीएसई, मॉडेल पब्लिक स्कूलमधील इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी ढोल सादरीकरण केले. नऊवारी साडी, फेटा, महाराष्ट्रीयन साज घातलेल्या विद्यार्थिनींनी तसेच पारंपारिक वेशभूषा केलेल्या व फेटे बांधलेल्या विद्यार्थ्यांनी गपणती बाप्पा मोरया च्या गजरात पुणेरी ढोल पथकाचे अप्रतिम सादरीकरण केले.
पुणेरी ढोल पथकामध्ये नऊवारी साडीतील पारंपारिक वेशभूषा केलेल्या व लाल रंगाचा फेटा घातलेल्या विद्यार्थिनी शोभून दिसत होत्या.
इंडियन मॉडेल स्कूल सी.बी.एस.ई.मधील विद्यार्थ्यांनी कमळ, स्वस्तिक या आकारांमध्ये झांज व झेंडा सादरीकरण केले.
तसेच मॉडेल पब्लिक स्कूल व इंडियन मॉडेल स्कूल स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर ठेका धरला.
दावत चौकापासून पतंजली मार्ट, गोविंदश्री, डी.मार्ट या मार्गाने इंडियन मॉडेल स्कूल येथे गणरायाची प्रतिष्ठापना आरती होऊन विसर्जित झाली.
या मिरवणूकीमध्ये मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपायुक्त विजय कबाडे , अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील , पोलिस उपायुक्त (HQ) हसन गौहर, विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दादा गायकवाड सर या मान्यवरांनी मिरवणूक यात्रेमध्ये उपस्थिती लावून मिरवणुकीची शोभा वाढवली.
या मिरवणुकीची संकल्पना इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सच्या सचिवा सायली जोशी यांची आहे. या मिरवणुकीमध्ये ४९० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सचे अध्यक्ष ए.डी. जोशी सर, सचिव अमोल जोशी सर, श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सायली जोशी मॅडम, कु. ईशा जोशी व चि. आर्य जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेत आल्यानंतर गणरायाची प्रतिष्ठापना व पूजा प्रशालेचे संस्थापक ए.डी. जोशी , सचिव अमोल जोशी सर, सचिवा सायली जोशी यांच्या हस्ते संपन्न झाली.




प्रशालेतील या वर्षीचे आकर्षण नरसिंह अवतार दर्शन प्रतिकृती प्रशालेतील कला शिक्षकांनी तयार केली आहे. कलाशिक्षक अनिल रॉय, शैलेश कुलकर्णी, निलेश क्षिरसागर, राधिका देवनपल्ली, नवनाथ कोळी, दिपक पाटील यांना प्रतिकृती तयार करण्याचे श्रेय जाते.
गेली २४ वर्ष डीजेमुक्त, डॉल्बीचा वापर न करता फक्त पारंपारिक वाद्यांची मिरवणूक इंडियन मॉडेल स्कूल तर्फे उत्साहाने साजरी केली जाते व याद्वारे ध्वनी प्रदूषण करू नये हा संदेश विद्यार्थ्यांना दिला गेला.
यावेळी इंडियन मॉडेल स्कूल्सच्या प्राचार्या अपर्णा कुलकर्णी, ममता बसवंती, अचला राचर्ला, आदिती कुलकर्णी, सुजाता बुट्टे, मानसी जोशी, स्वाती कारंडे, गौरी दातार, रुही काझी, ए. डी. जोशी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रवीण देशपांडे व मनोज साळुंखे उपस्थित होते.
ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रशांत पुणेकर, राहुल बिटोडकर, अभिजीत (बंटी) सोनके, नितीन बिराजदार, रमेश अंजिखाने, सुनील फुलवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.