येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरातील विविध गणेश मंदिरात सोमवारी गणेश जन्म उत्साहात साजरा करण्यात आला .गणपती घाट,दाते गणपती,आजोबा गणपती,दमाणी नगर मधील पावन गणपती तसेच सुशिलरसिक सभागृहात गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.गणपती घाटावरील गणेश मंदिरात अरुण जोशी यांनी षोडशोपचार पूजा करून दुपारी बारा वाजता पाळणा हलवण्यात आला होता. यावेळी भाविकांनी गर्दी केली होती . मात्र सर्वच भाविकांना मास्क लावण्याचे आवाहन मंदिरातर्फे करण्यात आले. सोशल डिस्टंसिंग पालन करत भाविकांनी मोदकांचा प्रसाद घेऊन घाटावरील गणपती चे दर्शन घेतले .चौपाड येथील आनंद मंगल कार्यालयासमोरील दाते गणपती मंदिरात देखील गणेश जन्म साजरा करण्यात आला .सराफ व कौशिक दाते यांच्या शंखध्वनी ने वातावरणात उत्साह संचारला होता. ओंकार दाते यांनी सांगितले की ,यंदा गणरायाला नव्याने शेंदूर लावून गणेश जयंती निमित्त षोडशोपचार पूजा करण्यात आली.