रविवार, दि. 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता डॉ. निर्मलकुमार फडकूले सभागृह येथे गणेशयुग गणपती विक्री केंद्र व गणेशयुग कॅलेंडर प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवि पवार, अविनाश महागावकर उपस्थित होते . सोलापुरकरांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घरी आणून घरच्या घरीच विसर्जन करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी केले.
गणेशयुगचे संस्थापक व आर्टिस्ट विकास गोसावी यांनी गणेशमूर्तींच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती दिली. विक्री केंद्रात लाल माती, शाडू माती व पेपर माशेच्या 6 इंचांपासून 3 फूट उंचीपर्यंतच्या 1000 हून अधिक मॉडेल्स उपलब्ध असून, त्यांची किंमत ₹500 ते ₹21,000 पर्यंत आहे.
या कार्यक्रमात कॅलेंडर जाहिरातदार तसेच फोटोशूटमधील सर्व मॉडेल्स उपस्थित होते व त्यांचा सन्मान गणेशयुग तर्फे करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन असावरी गांधी, सोनाली वाघमोडे, रेशमा गोसावी व अमोल मोहिते यांनी विशेष सहकार्य केले. सूत्रसंचालन भोमिशा शाह यांनी केले.





