पंढरपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कै राजु बापू पाटील यांचे सुपुत्र आणि कृषीराज शुगरचे सर्वेसर्वा व भोसे ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.या निवडीनंतर आज गोपाळराव पाटील मित्र परिवार पट कुरोली यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य अतुल खरात,कपील कोरके, युवकनेते गोपाळ पाटील बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर शिवाजी नाईकनवरे प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर नाईकनवरे गणेश देशमुख प्रवीण नाईकनवरे व इतर उपस्थित होते..