सोलापूर – सोलापूर शहरांमध्ये गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील ठिकठिकाणीच्या गणेश मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दुपारी बारा वाजता , पाळणा, गुलाल आणि उपस्थित भक्तांना महाप्रसादाचे वाटप असा कार्यक्रम संपन्न झाला. शहरातील श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्ट च्या वतीने गणेश जयंती चे मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले होते. सकाळी आठ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत मंदिरामध्ये वेगवेगळ्या धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, अथर्वशीर्ष, एक हजार नामावली, रुद्रअभिषेक, असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी सकाळच्या सत्रामध्ये श्रीनिवास गुजर, जयराज कुमणे, श्रद्धा वेदपाठक, स्नेहा मखरिया ,बसवराज नवले, संजय शरणार्थी, प्रशांत कडपट्टी , शिवाजी कराळे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली होती. दुपारी बारा वाजता महाआरती संपन्न झाल्यानंतर सुवासिनींच्या हस्ते पाळणा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गुलाल टाकण्यात आला. महाआरतीनंतर उपस्थित भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले

