सोलापूर – आस्था रोटी बँक व आस्था फाऊंडेशन, सोलापूर या समाजोपयोगी संस्था नेहमीच विविध उपक्रमांद्वारे गरजूंना मदतीचा हात देत असतात. यंदाच्या गणेशोत्सवात संस्थेने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. सोलापुरातील अंध-अपंग, एचआयव्ही ग्रस्त, निराधार आश्रम, अनाथ आश्रम तसेच वंचितांची शाळा अशा अनेक संस्थांना यंदा गणेश मूर्तींचे वाटप करण्यात येणार आहे. सण-उत्सवांचा आनंद उपभोगता येत नाही अशा वंचित घटकांपर्यंत उत्सवाचा उत्साह पोहोचवणे हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे.


वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेय देवः सर्व कार्येशु सर्वदा कोणत्याही नवीन सुरुवात करताना किंवा कार्य करताना श्रींच स्मरण व पुजा केली जाते.बाप्पा कार्य यशस्वी होण्यासाठी मदत करतो.भाद्रपद शुध्द चतुर्थीला बाप्पांचे आगमन होते. गणपती बाप्पांची स्थापना केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते असे मानले जाते. तसेच तो बुध्दीचा ही देवता आहे , तो शिक्षणाचा स्वामी देखील मानला जातो.प्रथम पुजेचा मान अग्रपुजेचा मान बाप्पांना आहे.
यंदाच्या वर्षीही आस्थाच्या वतीने 31 संस्थांना जसे की कुष्ठरोग वसाहत,वंचित,अंध ,अपंग संस्था,बालक अनाथ आश्रम ,HIV पिडीतांसाठी कार्य करणाऱ्या संघटना निराधार आश्रम अश्या अनेक संस्थांचा समावेश आहे. आज पासून गणपती बाप्पांचे आगमन घराघरात होत, 10 दिवस बाप्पांचा पाहुणचार केला जातो.आदरातिथ केल जाते.
बाप्पांच्या स्थापनेने हया वंचितांच्या आयुष्यातील दुःख दूर व्हावे त्यांच्या भविष्यात त्यांना बाप्पांचा भरभरून आशिर्वाद मिळावा लहानांना बुध्दी तर इतरांना आयुष्य आरोग्य लाभावे हया हेतूने आज श्रींच्या मुर्तींच वाटप कार्यक्रमासाठी विजापूर वेस मधील चौडेश्वरी मंगल कार्यालयात थाटामाटाने सःपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून किर्तनकार सुधाकर इंगळे महाराज , विक्रम खुलबुडे – पत्रकार अध्यक्ष , राजशेखर हिरेहब्बु सिध्देश्वर पहिले नंदीध्वजाचे मानकरी , गुरुनाथ निंबाळे रायलिंग चौडेश्वरी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष, साधना सांगवी, अमित काबणे,आमर म्हैत्रे , कसबा गणपती मंडळाचे उत्सव अध्यक्ष बाळासाहेब मुसतारे आदींची उपस्थिती होती.यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सर्व संस्था चालकांना गणपती मूर्तीचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस्था रोटी बँकेचे सदस्य हिरेमठ, पुष्कर पुकाळे, कांचना हिरेमठ, छाया गंगणे, श्रद्धा अध्यापक, संपदा जोशी, नीता अकुर्डे, अनिता तालीकोटी, विनोद भोसले, प्रकाश डोंगरे, स्नेहल वनकुद्रे, सुरेखा पाटील, स्नेहा मेहता, प्रतिक्षा लोखंडे, श्रीदेवी पाटील, सविता जोशी विजयालक्ष्मी सिंदगी, वंदना सिंगम, मंगल पांढरे, ज्योत्सना सोलापूरकर, अविनाश मार्चेला, विजय छंचुरे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे केले तर आभार प्रदर्शनज्योत्स्ना सोलापूरकर यांनी केले.