येस न्युज मराठी नेटवर्क । वळसंग पोलिसांना गुप्तच बातमीदार मार्फत बातमी मिळाली की गाडी क्रमांक एम एच 13 सी एस 2360 या कारमध्ये गुलबर्गाहुन सोलापूर कडे गुटका जन्य पदार्थ घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यानंतर वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी वळसंग बस स्टँड येथे सापळा लावला होता.
गुलबर्गा हुन सोलापूरच्या दिशेने येत असताना वळसंग एसटी स्टँड येथे सदरच्या गाडीला थांबून त्या गाडीची झडती घेतली असता त्या गाडीमध्ये विमल पान मसाला 400 पाकीट किंमत 48 हजार रुपये..v1 तंबाखू 400 पाकीट किंमत बारा हजार रुपये.. आर एम डी पान मसाला 120 बॉक्स किंमत कसातरी 86 हजार.. एम सेटेड तंबाखू 120 बॉक्स किंमत 36 हजार.. रजनीगंधा पान मसाला एक किलो 24 बॉक्स किंमत 67000.. रजनीगंधा पान मसाला 15 पुढे किंमत आठ हजार… 100 बाबा 120 प्रीमियर चेविंग तंबाखू 60 बॉक्स किंमत 24 हजार 360 रुपये… व कार क्रमांक एम एच 13 सी एस 2360 किंमत पाच लाख रुपये असे एकूण सात लाख 82 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले आहे यातील आरोपी क्रमांक 1) आसिफ रमजान तांबोळी राहणार 188 पठाण चाळ जुना पुना नाका सोलापूर… आरोपी क्रमांक 2) मोहम्मद ईसाक बाबालाल तांबोळी राहणार जुना विडी घरकुल सोलापूर…3) हबीब शेख राहणार हुमनाबाद गुलबर्गा… 4)राजू शेठ राहणार हुमनाबाद गुलबर्गा असे आरोपीचे नाव असून यातील आरोपी आरोपींना ताब्यात घेऊन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला पानमसाला सुगंधी तंबाखू गुटका सदृश्य असे पदार्थ साठी विक्री करू नये असे काढलेल्या आदेशाचे भंग केल्याप्रकरणी वरील आरोपींवर भ द वि कलम 188, 272, 273, 328 ,34 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलम एकूण 60 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले हे करत आहे