सोलापूर: आज बाळूमामा मंदिर बेलाटी येथे मंदिराचे मुख्य विश्वस्त आदरणीय श्रीरामजी पाटील यांच्यासमवेत श् सोमनाथ वैदय यांनी बाळूमामाचे दर्शन घेऊन दक्षिण सोलापूरच्या भावी आमदारकी साठी आशीर्वाद घेतला तसेच श्रीराम मामा यांच्या आदेशानुसार दर्शनाला येणाऱ्या भाविकाच्या राहण्याची व्यवस्थेसाठी 1 रूम बांधकामसाठी श्री सोमनाथ वैदय यांनी सढळ मदत केली आहे.आपण बाळूमामा यांचे अतिशय कट्टर भक्त असून बाळूमामा मंदिर संस्थान बांधकाम साठी मदत करून मला प्रचंड मोठे समाधान मिळाले आहे असे वैदय यांनी भावना व्यक्त केल्या.यापूर्वी सोमनाथ वैदय यांनी श्रावण महिना निम्मित दक्षिण सोलापूर ग्रामीण तालुक्यातील दहापेक्षा जास्त महादेव मंदिर व धनगर सामाजाचे दैवत,संत,महात्मे,यांच्या मंदिरात भाविकासाठी महाप्रसाद व्यवस्था करून सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद घेतला आहे, 22 तारखेला भंडारी मैदान जुळे सोलापूर येथे सोलापूर येथील सर्वात मोठी दहीहंडी आयोजन करून हिंदू धर्मातील रूढी परंपरा ताकदीने जोपसण्याचे कार्य केले आहे तसेच येत्या 26 तारखेला 6 दिवसीय अती रुद्र स्वाहाकार यज्ञ बसवारूढ मठ आयोजनासाठी श्री वैदय यांनी मदत केली आहे
याप्रसंगी बाळूमामा मंदिर येथे पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते. खंडोबा हे आपले कुलदैवत असून संत, महात्मे आणि कर्मयोगी यांची सिद्धस्थाने यांचा विकास करणे हाच माझा आगामी काळातील संकल्प असल्याचे श्री सोमनाथ वैदय यांनी सांगितले.सर्वसामन्य जनतेने मला ताकद दिली तर मी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास करून दाखवेन आणि सर्व समाजाची सेवा करेन असे स्पष्ट केले.