अक्कलकोट – शहरासाठी ज्या ज्या गोष्टी करता येईल त्या सर्व कामांसाठी निधी मिळवून दिलेला प्रत्येक शब्द न शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.अक्कलकोट, ता. 20 : अक्कलकोट शहरात सध्या वाढत असलेल्या स्वामी भक्तांचा ओघ भविष्यात आणखी वाढावा आणि आलेले स्वामीभक्त या ठिकाणी राहून अक्कलकोट शहरातील नैसर्गिक आणि धार्मिक वैविध्य अनुभवावे यासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे हर तऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून श्री स्वामी समर्थ मंदिरा जवळ असलेल्या हत्ती तलावात आकर्षक विद्युत रोषणाईने युक्त संगीत कारंजा बसवण्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. यासाठी प्रशासकीय मान्यता मिळालेले असून लवकरच हे काम सुरू होऊन हत्ती तलावाच्या म्हणजेच शहराच्या सौंदर्यात आणखी वाढ होणार आहे.
कोरोना काळाच्या नंतर अक्कलकोटच्या धार्मिक पर्यटनात मोठी वाढ झाली असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या ओघ हा दिवसेंदिवस अधिक होतो आहे. यापूर्वी अक्कलकोटला भाविक येणे आणि दर्शन घेणे आणि तासभर नंतर लगेच सोलापूरला परत जाणे असा त्यांचा प्रवास असायचा. मागील दोन वर्षांपासून अक्कलकोट शहरात राहण्यासाठी चांगले लॉजिंग, स्वच्छ व टाप टीप सकस आहार विहार मिळणारे हॉटेल्स, शहराला चारही बाजूने जोडणारे राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते यामुळे भाविकांची अक्कलकोटला मुक्कामी राहणाऱ्यांची संख्या खूप वाढलेले आहे. त्याचा नेमका लाभ अक्कलकोटच्या व्यापाऱ्यांना आणि पर्यटनाच्या वृद्धीसाठी व्हावा याचा विचार करून आमदार कल्याणशेट्टी यांनी संस्थानकालीन ऐतिहासिक हत्ती तलावाचे नूतनीकरण आणि सौंदर्यकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला असून पहिल्या टप्प्यात तिथल्या बांधकामासाठी रुपये पाच कोटीचा निधी मिळालेला आहे. त्याच अनुषंगाने पुढील काम हे हत्ती तलावामध्ये कारंजा बसवणे हे असणार आहे आणि त्यासाठी सुद्धा लागणाऱ्या पाच कोटींच्या निधीच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळालेले आहे.यासाठी एकूण 10 कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे.
सदर कारंजाचे वैशिष्ट्य असे की त्यासाठी लागणारे पाणी हे थेट कारंजामध्ये न येता ते पाणी शुद्धीकरण करून कारंजा मध्ये घेतले जाणार आहे जेणेकरून कारंजा नियमितपणे विनाअडथळा सुरू राहण्यात कोणतीही अडचण येणार नाही. सदर कारंजे आकर्षक विद्युत रोषणाई आणि संगीतमय असणार आहे. सदर यंत्रणा ही वाढीव यंत्रणेच्या स्वरूपात असल्याने भविष्यात आणखी एखादी लाईन कारंजा करण्यासाठीची टाकावयाचे झाल्यास कमी निधीमध्ये आणखी एक कारंजाचे लाईन सुरु करता येऊ शकते.यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा नियोजन अधिकारी पवार यांचे सहकार्य लाभल्याचे कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले. यामुळे शहरातील नागरिक आणि स्वामी भक्तामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे
आमदार सचिन कल्याणशेट्टी
या हत्ती तलावाच्या एकूण 10 कोटी रुपयांच्या कामांमुळे अक्कलकोट शहराच्या सौन्दर्यात भर पडणार असून शहर वासियांबरोबरच देश-विदेशातून येणाऱ्या स्वामी भक्तांची धार्मिकतेबरोबरच विरंगुळा म्हणून करमणूकीची मोठी सोय होणार असून शहराच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.