सोलापूर, दि. 11- सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 60 वर्षांच्या तुलनेने मागील आठ वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. प्रामुख्याने रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छतेची कामे झाली आहेत व होत आहेत. या पुढील काळातदेखील सोलापूर दक्षिणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही आमदार सुभाषबापू देशमुख यांनी दिली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी ते होटगी रस्ता भूमिपूजनाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार सुभाषबापू देशमुख हे बोलत होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष श्री रामप्पा चिवडशेट्टी, बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महाजन, भाजपचे सरचिटणीस यतीन शहा, आप्पासाहेब मोटे, इंगळगी सोसायटीचे चेअरमन शिलिशिद्ध कोटे, उद्योजक शिवानंद हत्तुरे, ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर घोडके, विद्याधर वळसंगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बसवराज गाडेकर, माणिकराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राहुल वंजारे यांनी केले.
आमदार देशमुख म्हणाले की, पूर्वी तालुक्यात रस्ते अतिशय खराब होते. यामुळे नागरिकांना खडतर वाटेतून प्रवास करावे लागत असे. आता मात्र केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमुळे रस्ते अतिशय चांगले झाल्याचे आपण पाहतो. सर्वच गावात पाण्याची देखील चांगली सोय चालू आहे. गावच्या विकासासाठी व समृध्दीसाठी निधी कमी पडू देणार नाही, यासाठी आपले पाठपुरावा महत्वाचे असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.
यावेळी भाजप बूथ प्रमुख सागर धुळवे, राजशेखर बंडगर, विनोद बनसोडे, प्रधान गुरव, सचिन वळसंगे भीमाशंकर कोळी, रफिक शेख, धनराज वळसंगे, गोरख माळी, रेवणा स्वामी, अमर माने, राम माने, भगवान राऊत, जितेंद्र गायकवाड, प्रदीप घोडके, गुलाब शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमाशंकर बंदीछोडे यांनी केले.