सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मच्छीमार संघटनेकडून काँग्रेस भवन येथील सभागृहा मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.. यावेळी मच्छीमार संघटने कडून काही अडचणी जाणून घेतल्या.. देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदेनी सांगितले की मच्छीमार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोणतीही अडचण लागल्यास डायरेक्ट मला संपर्क साधा असे आव्हान सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले आहे.माझी कन्या प्रणिती शिंदे ही लोकसभेसाठी सोलापूर जिल्ह्यातून उभारले असून आपल्या मच्छीमार संघटने कडून संपूर्ण पाठिंबा असेल अशी मी आशा बाळगतो असेही त्यांनी सांगितले आहे.
तसेच सोलापूर जिल्ह्यातून भोई व मच्छिमार समाजाचे मतदान चाळीस हजार पेक्षा जास्त असून आपल्याला वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे असे महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मार्तंडजी नाखवा यांनी सांगितले आहे..
यावेळी महाराष्ट्र प्रदेश फिशरमेन काँग्रेसचे उपाध्यक्ष व मच्छिमार समाजाचे नेते प्रकाश नगरे, जिल्हाध्यक्ष भिमाशंकर भोई, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अँड. नंदकुमार पवार , जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे , भोई समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष महादेव भोई , दत्ता भोई, बापूराव भोई, गजानन भोई समाधान भोई, बंडू भोई,तसेच जिल्ह्यातील फिशरमेन काँग्रेसचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन समाधान भोई तर आभार प्रदर्शन प्रशांत भोई यांनी मानले आहे..