सोलापूर : शरद पवार व दाऊद इब्राहिम यांची भेट होती. त्यानंतर बॉम्ब ब्लास्ट झाले असा मोठा गौप्यस्फोट करत पुढे 1990 ते 2000 कालावधीत अनेक ठिकाणी ब्लास्ट झाले. आणि त्या भेटीचा काय संबंध आहे का? त्याची चौकशी झाली पाहिजे. आता तशीच परिस्थिती दिसत आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडायची नसेल तर ही चौकशी करा अशी मागणी आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली. माझ्या आरोपांचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करावा असेही ते म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यासाठी सोलापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले, देशाच्या संरक्षणाचा विषय तुमच्या अजेंड्यावर कधीच नाही, तुम्हाला जात आणि धर्माच्या बाहेर जायचे नाही. केंद्रीय गृहमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे यांनी बोरा कमिटीतील अहवालातील annexure का सभागृहासमोर आणले नाहीत याचे उत्तर त्यांनी द्यावे असे आव्हान दिले.
देवेंद्र फडणवीस यांना माझे चॅलेंज आहे, ओरिजनल संविधान जे आहे त्याचा कलर कोणता आहे त्यांनी सांगावे, राहील गांधी जे लाल संविधान घेऊन फिरतात ते भाजपने पब्लिश केले आहे.
सोलापूर आणि पुणे दोन्ही जिल्ह्यात दोन्ही साम्य आहे, दोघांनी जास्त मंत्रिपद घेतली, अन् पाणी असूनही तहानलेली आहेत. मागच्या लोकसभेत मी उमेदवार होतो, त्यावेळी आठवडाभर पाण्यासाठी वाट बघत बसावं लागतं, पाच वर्षात निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनीने आहे तीच परिस्थिती ठेवली. इथल्या जनतेला ही परिस्थिती अपेक्षित आहे का असे दुर्दैवाने वाटते.
वंचित बहुजन आघाडीचे गॅस सिलेंडर स्वीकारावे आणि जिल्ह्यात बदल घडवून आणावा असे आवाहन केले.
पश्चिम महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडवला तर लाडकी बहीण सारखी योजना आणण्याची गरज वाटत नाही असे ही ते म्हणाले.
सोलापूर हे एक टेक्सटाइल हब आहे, याठिकाणी टेक्सटाइल कमिशनर ऑफिस आवश्यक आहे, टेक्सटाइल उद्योजकांनी मोदी प्रेम कमी केले तर या व्यावसायाची भरभराट होईल.