येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असून महाविकास आघाडी सरकारनं मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे कोरोना लसीकरण करण्याचे सर्व राज्यांना आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातही लसीकरणाचा मुद्दा चर्चेत होता. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात प्रामुख्यानं मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरुन चर्चा झाली. त्यानंतर राज्य सरकारकडून मोफत लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.