डॉ.कोटणीस मेमोरियल सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल, आधार हॉस्पिटल आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सोलापूर वाणिज्य विभाग यांच्या सौजन्याने माथाडी कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे व प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या आरोग्य शिबिराचे उदघाटन करण्यात आले.सकाळी 8.30 वाजता मालधक्का, सोलापूर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी केले.प्रास्ताविक करते वेळी पाटील यांनी , कार्यक्रमाचा उद्देश आणि माथाडी कामगारांचे आरोग्य यामुळे रेल्वे विभागाची होणारी प्रगती याचा उल्लेख केला. शिवाय विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांनी आपल्या भाषणात , मालगाड्यांचे जाळे सुरळीत चालू ठेवण्यासाठी माथाडी कामगारांचे योगदान किती महत्वाचे आहे हे समजून सांगितले .

या आरोग्य शिबिरात कामगारांच्या तब्येतीची सामान्य चाचणी,रक्तदाब तपासणी,एसिजी,टीट्यानस इंजेकशन यांच्यासोबत डॉक्टरांच्या देखरेखीखाली मोफत गोळ्या -औषधाचे वितरण करण्यात आले. जवळपास 187 माथाडी कामगारांनी या शिबिराचा लाभ घेतला.

अप्पर विभागीय व्यवस्थापक अंशुमाली कुमार ,मुख्य वैद्यकीय अधीक्षक आनंद कांबळे,वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील,वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक जे.एन.गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थित व डॉ. विनोद यांच्या मार्गदशनाखाली या शिबिराचा उदघाटन सोहोळा संपन्न झाला. यावेळी रोटरी क्लब चे अध्यक्ष सुनील माहेश्वरी, सचिव ब्रिज कुमार कोईदाणी यांच्यासह मुख्य माल परिवेक्षक श्री सलीम काझी, मुख्य परिचारिका अधीक्षक राहुल गंबरे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य कार्यालयीन अधीक्षक उल्हास बागेवाडी यांनी केले.