सोलापूर : लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने प्रभाग 26 मध्ये कल्याण नगर येथे एस.बी. हायस्कूल शाळा येथे मोफत आरोग्य तपासणी व मोफत नेत्र तपासणी कार्यक्रम आयोजित केला होता त्याचे उद्घाटन प्रभाग 26 च्या कार्यकुशल नगरसेविका व कोरोना सारख्या महामारी मध्ये सदैव नागरिकांच्या मदतीला धावून येणाऱ्या सौ राजश्री चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी आमदार सुभाष देशमुख यांचे स्वीय सहाय्यक अजय कोंढुर, डॉ. राजशेखर जेऊरे, सुरज जाधव, संजय पाटील, सोहेल मुजावर,सिमरन मुजावर, सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल हिरेपट, आरिफ शेख, इराया स्वामी, वीरेश हुक्केरी, ओंकार म्हमाणे, दिनेश वाघमारे, मयुर दिक्षे, रुद्रेश स्वामी. आदी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली व तसेच कल्याणेश्वर बहुउद्देशीय समाजसेवी संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले