नागरीकांकडुन शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद
सोलापूर : मालन नेत्रालय व लायन्स क्लब ऑफ सोलापूर रॉयल व लायन्स क्लुब ऑफ सोलापूर ट्वीन सिटी यांच्यासंयुक्त विद्यमाने यांच्यावतीने नेत्र तपासणी व बी पी तपासणी व शुगर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराचे मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा श्रीकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, काँग्रेस पक्षाचे गटनेते चेतन नरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी महापौर नलिनी चंदेले, माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी महापौर अरिफ भाई, शेख माजी स्थायी समिती सभापती शिवलिंग कांबळे बाटलीवाला, नगरसेवक प्रथमेश कोठे, नगरसेवक विनोद भोसले, डॉक्टर दौला ठेंगील, मुकुंद जाधव, नंदिनी जाधव, इजि. सागर पुकाळे, सुनंदा शेंडगे शैलेश कोरवार नितीन साळुंखे, स्वामी विवेकानंद प्रशालेचे प्राचार्य अंबादास पांढरे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, शिवपुत्र गायकवाड, बाबू गायकवाड, राज लोखंडे ओम वडणे राहुल तळभंडारे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक आठवले यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत आठवले तर आभार स्वप्निल मधुकर आठवले यांनी मानले. मान्यवरांचे स्वागत राजरत्न आठवले व अमोल आठवले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी मालन नेत्रालय सर्व कर्मचारी वृंद मुकुंद गायगवळी अरबाज इनामदार कुणाल लोखंडे अभिषेक हेगडे रोहन तपासे आदर्श सीताफळे आदींनी परिश्रम घेतले. माजी नगरसेवक मधुकर आठवले यांनी राबवलेल्या या उपक्रमाबद्दल नागरिकांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.